¡Sorpréndeme!

Success Password With Sandip Kale | Uday Samant | Sakal Media |

2022-05-28 122 Dailymotion

उदय सामंत सर्वसामान्य कार्यकर्ता ते उच्च तंत्रशिक्षण मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. साधेपणा कसा असावा. कार्यकर्त्याला एखाद्या लेकरा प्रमाणे कसं जपावं. येणाऱ्या प्रत्येकाचे काम मार्गी लावत सामाजिक कार्याला हातभार कसा लावायचा हा हातखंडा उदय सामंत यांचामध्ये सातत्याने जाणवतो. प्रचंड मेहनत, आणि जिद्दीच्या जोरावर उदय सामंत यांचा आत्तापर्यंतचा झालेला प्रवास हा ऐतिहासिक प्रवास ठरलेला आहे. मातृभक्ती, स्वामीभक्ती, आणि लोकभावनेचा आदर या तीन तत्त्वाच्या जोरावर उदय सामंत यांनी केलेला आतापर्यंतचा प्रवास हा सक्सेस मिळवणाऱ्या त्या विशाल वाटेचा अफाट रस्ता आहे. त्यांची आई, मित्र, परिवार या सगळ्या पलीकडे जाऊन त्यांच्याभोवती असलेला कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग या सगळ्यांना सांभाळत सांभाळत आपल्या राजकारणाची प्रत्येक शिडी अगदी तत्व मूल्याने पार करणारे उदय सामंत यांच्या सक्सेस होण्यामागचं गमक नेमके आहे तरी काय? हेच 'सक्सेस पासवर्ड' या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळचे संपादक संदीप काळे यांनी 'सक्सेस पासवर्ड' या शोच्या माध्यमातून उदय सामंत यांच्या जबरदस्त प्रवासाला डोळ्यासमोर आणले आहे. त्यांच्या सक्सेस मागचे पासवर्ड नेमके आहे तरी कोणते हे जाणून घेण्याचा प्रयत्नही या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला आहे. चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड' विथ संदीप काळे.